Breaking News

मुरूड नगर परिषदेकडून जंतुनाशक फवारणी

मुरूड ः प्रतिनिधी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुरूड नगर परिषदेकडून संपूर्ण मुरूड शहरात जंतुनाशक फवारणी करण्यात आली. अग्निशमन गाडीच्या साह्याने रस्त्याच्या बाजूला असणारी गटारे व घाणीच्या सर्व ठिकाणांवर सोडियम हायपोक्लोराईडची फवारणी करण्यात आली. नगराध्यक्ष स्नेहा पाटील, मुख्याधिकारी अमित पंडित, विरोधी पक्षनेते मंगेश दांडेकर व सर्व नगरसेवकांच्या मागणीनुसार सदरची फवारणी मुरूड शहरात सुरू करण्यात आली. या औषध फवारणीमुळे मुरूडमधील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Check Also

भाजप उत्तर रायगड जिल्हा कार्यकारिणीची मासिक बैठक

विविध विषयांवर विचारविनिमय पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष उत्तर रायगड जिल्हा कार्यकारिणीची मासिक बैठक …

Leave a Reply