Breaking News

गोरोबा काका मित्र मंडळाकडून अल्पोपहार

नागोठणे : प्रतिनिधी

आज संपूर्ण देशावर कोरोनाचे संकट ओढवले आहे. या महामारीतही आपले कर्तव्य बजावणारे नागोठणे पोलीस, ग्रामपंचायत सफाई कर्मचारी तसेच गोरगरिबांना कुंभारआळीतील तरुणांनी स्थापन केलेल्या संत शिरोमणी गोरोबा काका मित्र मंडळाकडून शनिवारी (दि. 28) सकाळी अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले. या उपक्रमात ग्रामपंचायत सदस्य मोहन नागोठणेकर यांच्यासह मंडळाचे अध्यक्ष रूपेश नागोठणेकर, कुंभारआळी ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष संतोष नागोठणेकर, संस्थापक प्रमोद नागोठणेकर, उपाध्यक्ष राजेंद्र नागोठणेकर, सल्लागार किशोर नागोठणेकर, विशाल नागोठणेकर तसेच सदस्य किरण नागोठणेकर, दीपक घोसाळकर, महेंद्र नागोठणेकर, अक्षय नागोठणेकर सहभागी झाले होते.

Check Also

भाजप उत्तर रायगड जिल्हा कार्यकारिणीची मासिक बैठक

विविध विषयांवर विचारविनिमय पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष उत्तर रायगड जिल्हा कार्यकारिणीची मासिक बैठक …

Leave a Reply