Breaking News

माणगावात तिसर्या दिवशीही शुकशुकाट

माणगाव ः प्रतिनिधी

कोरोनाचा प्रतिकार करण्यासाठी माणगाव व तालुक्यातील मोर्बा गावातील दुकानदारांनी स्वयंस्फूर्तीने दि. 2, 3 व 4 एप्रिलपर्यंत पूर्णपणे बंद पाळण्याचा निर्णय घेतला. सलग तिसर्‍या दिवशीही माणगाव व मोर्बा या ठिकाणी कडकडीत बंद पाळण्यात येऊन सर्वत्र शुकशुकाट होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माणगाव, मोर्बात कडकडीत बंद पाळण्यात आल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी शशीकिरण काशीद यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता, तसेच यापुढेही चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी नागरिकांनी घरातच राहून सरकारच्या सूचनांचे पालन करणे जरुरीचे आहे. या विळख्यातून बाहेर पडण्यासाठी सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहेत. सरकारच्या या प्रयत्नांना माणगावातील जनतेने सहकार्य करावे, असे आवाहन तालुक्याच्या उपविभागीय अधिकारी प्रशाली जाधव-दिघावकर यांनी केले आहे. सर्वांच्या सामुदायिक प्रयत्नांतून आपण कोरोनाचा माणगावात शिरकाव होऊ देणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा शनिवारी ‘रयत’तर्फे हृद्य सत्कार

संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते होणार गौरव सातारा : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या …

Leave a Reply