Breaking News

मजुरांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप

नागोठणे ः प्रतिनिधी – नागोठणे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे आणि कर्मचारी तसेच नागोठणे ज्वेलर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोलमजुरी करणार्‍या 10 गरीब कुटुंबांना 15 दिवस पुरेल एवढ्या जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. सध्या कोरोनामुळे सर्व रोजगार ठप्प झाला असून कामधंदा उपलब्ध नसल्यामुळे या मजुरांची उपासमार होत आहे. ही परिस्थिती निदर्शनास आल्याने पोलीस ठाणे आणि ज्वेलर्स असोसिएशनच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे यांनी स्पष्ट केले.

Check Also

राम तेरी गंगा मैली @४१ वर्षे; राज कपूरच्या दिग्दर्शनातील शेवटचा चित्रपट

चित्रपटाच्या नावात त्याचं व्यक्तिमत्त्व अथवा ओळख व्हायला हवी. त्यातही दिग्दर्शक दिसतो. राज कपूरच्या दिग्दर्शनातील चित्रपटाचे …

Leave a Reply