पोलिसांना सेफ्टी गॉगल्स

पनवेल : वार्ताहर

पनवेल तालुका पोलीस ठाण्याची हद्द मोठी असून जवळपास 81 गावासह मुंबई-पुणे महामार्ग, एक्सप्रेस महामार्ग व मुंबई-गोवा महामार्गाचा काही भाग त्यांच्या अखत्यारीत येतो. या ठिकाणी दिवस-रात्र कर्तव्य बजावित असणार्‍या 50 अधिकारी व कर्मचार्‍यांसाठी पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत यांनी पुढाकार घेवून व्हिनस कंपनीच्या सेफ्टी गॉगल्सचे वाटप केले. सध्याच्या लॉकडाऊनच्या काळामध्ये अत्यावश्यक सेवेची वाहने रस्त्यावर ये-जा करतात. तर काही जण गुपचुपपणे पायी आपल्या मुक्कामी जात असतात. तर कित्येक जण अत्यावश्यक सेवा असणार्‍या वाहनातून जीव धोक्यात घालून प्रवास करीत आहेत. अशांना पनवेलच्या वेशीवर थांबविण्याचे काम पनवेल तालुका पोलिसांचे 50 अधिकारी व कर्मचारी वर्ग दिवस-रात्र करीत आहेत. या अधिकारी व कर्मचार्‍यांसाठी सुरक्षेच्या दृष्टीने यापूर्वी सुद्धा नवी मुंबई आयुक्तालयातर्फे फेस मास्क देण्यात आले आहेत. त्याचे वाटप सर्व अधिकारी व कर्मचारी वर्गांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत यांनी केले होते. परंतु या अधिकारी व कर्मचार्‍यांच्या डोळ्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने व्हिनस कंपनीने काढलेले सेफ्टी गॉगल्स हे त्यांना फायद्याचे ठरतील असे अशोक राजपूत यांना वाटले व त्यासाठी त्यांनी सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांसाठी गॉगल्स खरेदी करून बुधवारी वाटप केले.

Check Also

Как использовать аналитические функции на 1xbet зеркало

Как использовать аналитические функции на 1xbet зеркало Аналитические функции на платформе 1xbet зеркало предоставляют пользователям …

Leave a Reply