Breaking News

देवेंद्र फडणवीस यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह पोस्ट टाकणार्यांवर कारवाई करावी

खोपोली शहर भाजपची मागणी

खोपोली ः प्रतिनिधी

माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या प्रत्येक कृतीवर सामाजिक माध्यमांमध्ये असंसदीय शब्दांत टीका केली जात आहे. घाणेरडी अश्लील व्यंगचित्रे पोस्ट करण्यात येत आहेत. ही टीका अत्यंत हीन दर्जाची आहे. फडणवीस हे राज्याच्या राजकारणातील लोकाभिमुख, सुसंस्कृत व निष्कलंक व्यक्तिमत्त्व आहेत, परंतु हे भान न ठेवता काही जण गलिच्छ प्रकार करीत आहेत. या प्रकरणाची तत्काळ चौकशी करून असे कृत्य करणार्‍या समाजकंटकांविरोधात कारवाई करावी, अशी मागणी शहर भाजपच्या वतीने निवेदनाद्वारे खोपोली पोलिसांकडे करण्यात आली आहे. या वेळी खोपोली भाजप अध्यक्ष इंदरमल खंडेलवाल, जिल्हा महिला अध्यक्ष अश्विनी पाटील, शहर सरचिटणीस हेमंत नांदे, ईश्वर शिंपी, राकेश दबके आदी उपस्थित होते. पोलीस निरीक्षक धनाजी क्षीरसागर यांनी याबाबतचे निवेदन स्वीकारले.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply