पनवेल : वार्ताहरमुंबई-गोवा महामार्गावर पनवेल तालुक्यातील तारा गावाजवळ असलेल्या युसूफ मेहरअली सेंटर येथे एका टँकरने दुचाकीला दिलेल्या धडकेत मायलेकाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि. 17) दुपारी घडली. या अपघातप्रकरणी टँकरचालकावर पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. रोशन बबन भौड (वय 24), पुष्पा बबन भौड (वय 45, दोघेही रा. बांधनवाडी) अशी मृत मायलेकांची नावे आहेत. हे दोघे खालापूर येथून घरी येत होते. युसूफ मेहरअली सेंटरजवळ दुपारी 12.30च्या सुमारास त्यांच्या दुचाकीला (एमएच 46-बीसी 3452) टँकरने (जीजे 06-एएक्स 7272) पाठीमागून धडक दिली. या अपघातामध्ये भौड मायलेकाचा जागीच मृत्यू झाला. त्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.
Check Also
वाढवण बंदर बाधित मच्छीमारांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मंत्रालयात बैठक आमदार महेश बालदी यांची प्रधान सचिव लोकेश चंद्रा …
RamPrahar – The Panvel Daily Paper