Breaking News

कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असतानाही नवी मुंबईतील काही नागरिक बेफिकीरच!

नवी मुंबई ः बातमीदार

नवी मुंबईतील कोरोनाबाधितांच्या आकड्याने 800चा टप्पा ओलांडला असला तरी अद्याप नवी मुंबईकर बेफिकीरच असल्याचे दिसून येत आहे. शहरी भाग गर्दीमुक्त असले तरी गावठाण व झोपडपट्टी भाग मात्र गजबजलेले दिसत असून शहरातील नागरिकदेखील गावठाण भागात खरेदीसाठी येऊ लागले आहेत. त्यामुळे नवी मुंबईचा धोका अधिक वाढला आहे.

नवी मुंबईतील कोरोना रुग्णसंख्या वाढतच चालली आहे. नवी मुंबईने 800चा टप्पा ओलांडला असून पुढील वाटचाल सुरूच आहे. एखादा रुग्ण सापडल्यास त्या ठिकाणचे निर्जंतुकीकरण करण्यात येत नसल्याने नागरिकदेखील चिंतेत आहेत. समाजमाध्यमांवर त्याबाबत अनेकांकडून नाराजी व्यक्त होऊ लागली आहे, तर दुसरीकडे आरोग्य विभागातील कर्मचार्‍यांना कोरोनाची बाधा झाल्याने मनुष्यबळ कमी पडू लागले आहे. नागरिकांकडून वारंवार नियमांचे उल्लंघन होऊ लागले आहे. गेले दीड महिना घरात अडकून पडल्याने नागरिक सकाळी खरेदीची मुभा असल्याने बाहेर पडू लागले आहेत. निष्काळजीपणे जीवाची पर्वा न करता काही नागरिक घराबाहेर पडू लागले आहेत. सामाजिक अंतर ठेवण्यासाठी वर्तुळे आखून नागरिकांना धडे दिले जात आहेत, मात्र काही नागरिक याकडे दुर्लक्ष करीत आहेत. गावठाण भागात गर्दीने कहर केला असून शहरी भागातील नागरिक खरेदीसाठी गावठाण भागात येत असल्याने गावकर्‍यांना चिंता वाटू लागली आहे.

– रुग्णसंख्या आठशेपार नवी मुंबईची कोरोना बधितांची संख्या वाढत असून ही संख्या 856 झाली आहे. मंगळवारी एकाच दिवसात 77 रुग्ण आढळले आहेत. गेले आठवडाभर नवी मुंबईत रुग्ण बाधितांचा आलेख चढताच राहिल्याने नवी मुंबईकरांच्या चिंतेत भर पडली आहे. तर कोपरखैरणे, तुर्भे- सानपाडा व नेरुळ विभागाने आपले रुग्णांचे शतक पार केले असल्याने हे विभाग डेंजर झोनमध्ये आहेत. आजमितीस  पोजिटिव्ह ते निगेटिव्ह झालेल्यांची रुग्णांची  संख्या 171 झाली वर गेली आहे. कोरोनाने बळी पडलेल्यांच्यात देखील वाढ झाली असून ही संख्या 19  झाली आहे. विभागवार अकडेवारी पाहिल्यास  बेलापूर 5, नेरुळ 14, वाशी 4, तुर्भे 29, कोपरखैरणे 18, घणसोली 1, ऐरोली 6 व दिघा 0 असा विभागवार रुग्णांचा समावेश आहे.

Check Also

कोप्रोली येथे पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ

भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण योजना …

Leave a Reply