Breaking News

उरणमधील करंजात आणखी 44 पॉझिटिव्ह

उरण : प्रतिनिधी, वार्ताहर
उरण तालुक्यातील करंजा गावात बुधवारी (दि. 13) आणखी 44 कोरोना रुग्णांची भर पडली. त्यामुळे तालुक्याचा एकूण आकडा 105वर पोहोचला आहे. यातील सात जण बरे होऊन घरी परतले आहेत, तर उर्वरित 98 रुग्णांवर कामोठे एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
उरण तालुक्यात पहिल्या आठ कोरोना रुग्णांनंतर करंजा गावातील सुरकीचा पाड्यात एकाच दिवशी 21 पॉजेटीव्ह आढळले. दुसर्‍या दिवशी 27 नवे रुग्ण समोर आले. मंगळवारी त्यात पाचची भर पडली, तर बुधवारी तब्बल 44 रुग्णांची नोंद झाली. करंजातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालल्याने चिंता व्यक्त होत आहे.
उरण तालुक्यात ऑरेंज झोनही जाऊन आता रेड झोन लागू झाला आहे. त्यातच रुग्णसंख्या वाढत चालल्याने भीतीही वाढत आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक नागरिकाने खबरदारी घेणे आता अनिवार्य बनले आहे.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा शनिवारी ‘रयत’तर्फे हृद्य सत्कार

संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते होणार गौरव सातारा : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या …

Leave a Reply