पुणे : आषाढी एकादशीसाठी निघणारी पायी दिंडी यंदा कोरोनाच्या महासंकटामुळे रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भात शुक्रवारी (दि. 29) उपमुख्यमंत्री अजित पवार आणि वारकर्यांच्या प्रतिनिधींमधे पुण्यातील कौन्सिल हॉलमध्ये बैठक झाली. या वेळी आळंदी आणि देहुवरून निघणार्या पादुका हेलिकॉप्टर, एसटी किंवा विमानाने पंढरपूरला नेण्यात याव्यात अशी भूमिका मांडण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आषाढी वारीचे काय होणार, हा प्रश्न सर्व वारकर्यांना पडला होता. यावर अखेर शुक्रवारी निर्णय घेण्यात आला. आळंदी आणि देहुच्या पादुका दशमीला पंढरपूरला जाणार आहे. पादुका हेलिकॉप्टर, वाहन किंवा विमानाने न्यायच्या हे नंतर ठरलवे जाईल. देहू आणि आळंदीहून पायी दिंडी न नेण्याबाबत वारकरी आणि प्रशासनाचे एकमत झाल्याने यंदा पायी दिंडी सोहळा होणार नाही.
Check Also
‘जनसेवेचे अमृतपर्व’ ग्रंथाचे लोकनेते रामशेठ ठाकूर महाविद्यालयात प्रकाशन
मोखाडा : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या मोखाडा येथील लोकनेते रामशेठ ठाकूर कला, विज्ञान व वाणिज्य …
RamPrahar – The Panvel Daily Paper