पनवेल : रामप्रहर वृत्त – देशातील नक्षलग्रस्त आणि जोखिमच्या भागात 2015 ते 2018 या कालावधीत गडचिरोली जिल्ह्यातील झिंगापूर या अतिदुर्गम नक्षलग्रस्त भागात प्रभारी अधिकारी म्हणून खडतर सेवा पार पाडल्याबद्दल नवी मुंबई पोलीस आयुक्तालय अंतर्गत कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हे प्रकटीकरण पथकात कार्यरत असणारे डँशिंग पोलीस उपनिरीक्षक रोहित पंडितराव बंडगर यांना केंद्र सरकारने आंतरिक सुरक्षा सेवा पदक जाहीर केले गेले.पदक जाहीर होताच सर्व पोलीस दलात उत्साहाचे व आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वी बंडगर यांना अश्याच कामगिरीसाठी महाराष्ट्र शासनाने 26 जानेवारी 2020 रोजी विशेष सेवा पदकदेऊन गौरविण्यात आले होते.
Check Also
पनवेलमध्ये महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद
६४ कंपन्यांचा सहभाग; २५०२ उमेदवारांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तरोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींना थेट रोजगाराच्या …
RamPrahar – The Panvel Daily Paper