अलिबाग ः प्रतिनिधीतालुक्यातील आवास येथे शनिवारी सायंकाळी विजेच्या धक्क्याने पाच म्हशींचा जागीच मृत्यू झाला. यात म्हशींचे मालक अशोक भगत यांचे सव्वातीन लाख रुपयांचे नुकसान झाले. भगत यांच्या काही म्हशी चरण्यासाठी आवास ते किहीमदरम्यानच्या जंगलात गेल्या होत्या. चक्रीवादळामुळे अलिबाग तालुक्यात वीजवाहक तारा तुटून पडल्या आहेत. त्यांची जोडणी करून वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू आहे. त्यातील लोंबकळणार्या जिवंत वीजवाहिनीचा स्पर्श झाल्याने पाच म्हशी मृत्युमुखी पडल्या. या घटनेचा पंचनामा करून त्याची नोंद मांडवा सागरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
Check Also
आमदार महेश बालदी यांच्या निधीतून कामठा अंतर्गत रस्त्याचे लोकार्पण
उरण : वार्ताहरआमदार महेश बालदी यांच्या विशेष प्रयत्नातून आणि आमदार स्थानिक विकास निधी (२०२५-२६) अंतर्गत …