पनवेल : रायगड जिल्ह्यात सोमवारी (दि. 22) सलग चौथ्या दिवशी कोरोना रुग्णांच्या संख्येने शंभरी पार केली. जिल्ह्यात 102 नव्या रुग्णांची नोंद झाली असून, तीन जण मृत्युमुखी पडले आहेत. दिवसभरात पनवेल महापालिका हद्दीत 53, पनवेल ग्रामीण आणि कर्जत तालुक्यात प्रत्येकी 20, उरण तालुक्यात तीन, पेण व महाड तालुक्यात प्रत्येकी दोन, तर मुरूड व माणगाव तालुक्यात प्रत्येकी एक रुग्ण आढळला. मृतांमध्ये पनवेल महापालिका हद्दीतील दोन आणि कर्जत तालुक्यातील एक अशा तिघांचा समावेश आहे. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 2520 झाला असून, बळींचे शतक होऊन ही संख्या 101 झाली आहे. ‘अनलॉक’नंतर रुग्ण व मृतांचा आकडा वाढताना दिसत आहे.
Check Also
नवी मुंबई विमानतळाला लोकनेते स्व. दि.बा. पाटील यांचेच नाव दिले जावे यासाठी आम्ही आग्रही -मुख्यमंत्री
छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण पनवेल ः रामप्रहर वृत्तनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते स्व. …
RamPrahar – The Panvel Daily Paper