Breaking News

आता अभिनेत्री केतकी चितळेकडून छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख

मुंबई : प्रतिनिधी
स्टँडअप कॉमेडियन अग्रिमा जोशुआने शोदरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला असतानाच आता मराठी अभिनेत्री केतकी चितळे हिने फेसबुकवर एक पोस्ट लिहून महाराजांचा एकेरी उल्लेख केला आहे. त्यामुळे ती ट्रोल होत आहे.
जोशुआने छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील प्रस्तावित पुतळ्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले होते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शिवप्रेमींनी तिच्यावर कठोर शब्दांत टीका केली. त्यानंतर आता अभिनेत्री केतकी चितळेने केलेल्या पोस्टनंतर तिच्यावरही जोरदार टीका केली जात आहे.  
अग्रिमा जोशुआचा माफीनामा
अग्रिमा जोशुआ हिने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल अखेर माफी मागितली असून, वादग्रस्त व्हिडीओही सोशल मीडियावरून हटवला आहे.  समस्त शिवप्रेमींच्या आणि महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्या गेल्याने अग्रिमावर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत असतानाच तिने जाहीर माफी मागितली आहे.

Check Also

पनवेलमध्ये महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

६४ कंपन्यांचा सहभाग; २५०२ उमेदवारांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तरोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींना थेट रोजगाराच्या …

Leave a Reply