पनवेल : रायगड जिल्ह्यात आतापर्यंतच्या सर्वाधिक 463 नव्या कोरोना रुग्णांची नोंद गुरुवारी
(दि. 15) झाली असून, आठ जणांचा मृत्यू झाला आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील 251 (महापालिका 180 व ग्रामीण 71), पेण 86, खालापूर 47, माणगाव 19, कर्जत 18, अलिबाग 13, महाड 12, उरण 10, पोलादपूर चार, म्हसळा दोन आणि रोहा तालुक्यातील एकाचा समावेश आहे, तर मृत रुग्ण पनवेल तालुक्यात चार, महाड तीन व श्रीवर्धन तालुक्यात एक असे आहेत. दुसरीकडे दिवसभरात 250 रुग्ण बरे झाले आहेत. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 8809वर पोहोचला असून, मृतांची संख्या 230 झाली आहे. जिल्ह्यातील एकूण 5206 रुग्णांनी कोरानावर मात केल्याने सध्या 3422 सक्रिय रुग्ण आहेत.
Check Also
वाढवण बंदर बाधित मच्छीमारांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मंत्रालयात बैठक आमदार महेश बालदी यांची प्रधान सचिव लोकेश चंद्रा …
RamPrahar – The Panvel Daily Paper