Breaking News

कर्जत तालुक्यात 26 जण पॉझिटिव्ह

कर्जत : प्रतिनिधी, बातमीदार

कर्जत तालुक्यात कोरोनाने तीनशेचा टप्पा पार आला असून गुरुवारी एका माजी नगरसेवकासह 26 नवीन रुग्ण आढळले असून आत्तापर्यंतच्या आढळलेल्या रुग्णांमध्ये हा उच्चांक आहे.

तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या 311 गेली असून 155 रुग्ण कोरोनावर मात करून घरी आले आहेत. आढळलेल्या रुग्णांत नेरळ तीन, कर्जत नऊ, मुद्रे दोन, दहीवली पाच, पोसरी दोन, मोठे वेणगाव, हालिवली, गोरखामथ, कशेळे, कडाव येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

उरण तालुक्यात 17 नवे रुग्ण

उरण : प्रतिनिधी, वार्ताहर

उरण तालुक्यात गुरुवारी 17 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर  दोघांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली असून, त्यामध्ये चिर्ले आणि म्हातवली येथील रुग्णांचा समावेश आहे. तसेच 25 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

आढळलेल्या रुग्णांत जेएनपीटी वसाहत तीन, चिरनेर दोन, उरण दोन, धुतुम, करंजा, श्रीयोगनगर, कुंभारवाडा, करळ, बोकडविरा, द्रोणागिरी, विंधणे, सोनारी व आवरे येथे प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

त्याच प्रमाणे उरण तालुक्यातील एक हजार 163 नागरिकांची आत्तापर्यंत कोरोना चाचणी करण्यात आली असून आजपर्यंत एकूण 549 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यापैकी 383 रुग्ण पूर्ण बरे झाले आहेत. तर 15 जणांना कोरोनामुळे  स्वतःचा जीव गमवावा लागला आहे. याशिवाय 151 कोरोनाबाधित रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती उरणचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली आहे.

रोहा तालुक्यात 17 जणांना लागण

रोहे : प्रतिनिधी

रोहा शहरासह तालुक्यात गुरुवारी 17 कोरोना बाधीत व्यक्ती आढळल्याने बाधितांचा आकडा 309 झाला आहे. गुरुवारी 13 व्यक्तींनी कोरोनावर मात करुन बरे होत घरी आल्याने कोरोनावर मात करणार्‍या व्यक्तींची संख्या 218 वर पोहचली आहे. तर आतापर्यंत पाच जणांचा कोरोणामुळे मृत्यू झाला आहे.

रोहा तालुक्यात 86 सक्रीय कोरोनाबाधित असून त्यांच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी उपचार चालु आहेत. गुरुवारी आढळलेल्या रुग्णांमध्ये रोहा शहरात सात तर तालुक्याच्या ग्रामीण भागात 10 असून यात सहा महिलांचा व 11 पुरुषांचा समावेश आहे.

महाडमध्ये नऊ नवे कोरोनाबाधित

महाड : प्रतिनिधी 

महाड तालुक्यात गुरुवारी नव्याने नऊ कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, 10 जन उपचार घेऊन बरे झाले आहेत तर एकाचा मृत्यू झाला आहे.

महाड मधील कांबळे तर्फे बिरवाडी येथील 48 वर्ष पुरुष, संतोषनगर नांगलवाडी 52 वर्ष स्त्री, लक्ष्मी हाउसिंग सोसायटी नांगलवाडी 26 वर्ष पुरुष, साकडी कुसगाव 28 वर्ष पुरुष, टाकीचाकोंड बिरवाडी 32 वर्ष पुरुष, कुंभारवाडा बिरवाडी 38 वर्ष पुरुष, कुंभारकोंड नाते 33 वर्ष पुरुष, गवळआळी महाड 28 वर्ष पुरुष, काकरतळे महाड 42 वर्ष पुरुष यांना कोरोनाची लागण झाली आहे.

महाडमध्ये एकुण 41 रुग्ण उपचार घेत असुन 83 रुग्ण बरे झाले आहेत. तर 14 जनांचा कोरोना उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. महाड तालुक्यात अजुन पर्यंत 138 कोरोना पॉझिटिव्हची नोंद झाली आहे.

Check Also

नांदगाव येथे भाजप महायुतीचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात …

Leave a Reply