पनवेल : रायगड जिल्ह्यात 430 कोरोना रुग्णांची शुक्रवारी (दि. 7) भर पडली असून, सात जणांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे दिवसभरात 326 रुग्ण बरे झाले. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (महापालिका 186, ग्रामीण 31) तालुक्यात 217, पेण 48, रोहा 42, खालापूर 29, अलिबाग 21, माणगाव व सुधागड प्रत्येकी 14, महाड 12, मुरूड 11, कर्जत नऊ, उरण सात, श्रीवर्धन चार आणि म्हसळा तालुक्यातील दोघांचा समावेश आहे, तर मयत रुग्ण महाड तालुक्यात दोन आणि पनवेल, उरण, पेण, श्रीवर्धन व पोलादपूर तालुक्यात प्रत्येकी एक असे आहेत. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 17,776 आणि मृतांची संख्या 478 झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 14,017 जणांनी कोरोनावर मात केली असल्याने 3281 विद्यमान रुग्ण आहेत.
Check Also
लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा शरदरत्न जीवनगौरव पुरस्काराने सन्मान
मुंबई ः रामप्रहर वृत्तसमाजाच्या सुख-दुःखात सहभागी होणारे आणि कोणताही अभिनिवेश न ठेवता सर्वसामान्यांमध्ये मिसळून राहणारे …
RamPrahar – The Panvel Daily Paper