Breaking News

नवी मुंबई पालिकेस वैद्यकीय सुरक्षा साधने प्रदान

नवी मुंबई : बातमीदार

कोव्हीड 19 विरोधातील लढाईत विविध सामाजिक संस्था, उद्योगसमुह यांची स्वयंस्फुर्तीने मदत नवी मुंबई महानागरपालिकेस लाभत आहे. त्यानुसार शनिवारी (दि. 8) टाटा इंटरनॅशनल लिमी. यांच्या सीआर निधीतून एक कोटी 77 लक्ष रक्कमेची वैद्यकीय सुरक्षा साधने देण्यात आली आहेत. यामध्ये 10 हजार 500 नग एन 95 मास्क, 10 हजार सर्जिकल मास्क, 10 हजार 80 पीपीई किट्स, दोन हजार मेडिकल गॉगल्स, दोन हजार हॅन्डग्लोव्हज, सात हजार शू कव्हर अशी विविध सुरक्षा साधने देण्यात आली आहेत. या सुरक्षा साधनांचा उपयोग कोविड योध्द्यांना मोठ्या प्रमाणावर होणार असून टाटा उद्योगसमुहाने सामाजिक बंधिलकी जपण्याच्या उद्देशाने केलेल्या या मदतीबद्दल महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात येत आहेत.

Check Also

वाढवण बंदर बाधित मच्छीमारांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मंत्रालयात बैठक आमदार महेश बालदी यांची प्रधान सचिव लोकेश चंद्रा …

Leave a Reply