Breaking News

उरणमध्ये रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

उरण : आमदार प्रशांत ठाकूर व जेएनपीटी विश्वस्त तथा आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नाने सिडकोकडून डाऊरनगर येथे 45 लाखाच्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन शुक्रवारी (दि. 28) तालुका भाजप अध्यक्ष रवि भोईर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी सिडकोचे अधिकारी, शहर अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शाह, माजी सभापती नित्यानंद भोईर, चाणजे ग्रामपंचायत माजी सदस्य हेमंत भोईर, प्रसाद भोईर, राजू भोईर आदी उपस्थित होते. या रस्त्याचे काम मार्गी लावल्याबद्दल आमदार महेश बालदी यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Check Also

खारघर हिल महापौर मॅरेथॉन प्रोमो रनला उत्तम प्रतिसाद

खारघर ः रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या वतीने रविवारी (दि.19) आयोजित करण्यात आलेल्या खारघर हिल महापौर मॅरेथॉन …

Leave a Reply