Breaking News

’ती’ भेट अराजकीय; संजय राऊतांच्या भेटीनंतर फडणवीस यांची प्रतिक्रिया

मुंबई ः प्रतिनिधी

महाविकास आघाडी सरकार त्यांच्या कृतीमुळेच कोसळेल. आम्हाला सरकार स्थापण्याची कोणीतीही घाई नाही, अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या भेटीनंतर विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्याचबरोबर संजय राऊत यांच्यासोबत झालेली भेट अराजकीय असून शिवसेनेसोबत सत्तास्थापनेवर कोणतीही चर्चा झाली नसल्याचेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. शनिवारी मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये राऊत आणि फडणवीस यांच्यात तब्बल अडीच ते तीन तास चर्चा झाली. त्यानंतर शिवसेना-भाजपमध्ये पुन्हा युती होणार का, अशा चर्चा रंगत होत्या, मात्र रविवारी देवेंद्र फडणवीस यांनी या चर्चा फेटाळून लावत ही भेट अराजकीय असून ’सामना’च्या मुलाखतीसाठी बैठक केल्याचे सांगत शिवसेनेसोबत सत्ता स्थापनेचा कोणताही विचार नाही, असे स्पष्ट केले आहे.

Check Also

महाराष्ट्रातूनही ५० लाख घुसखोर बांगलादेशी बाद होणार -किरीट सोमय्या

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय निवडणूक आयगाच्या वतीने विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) अभियान राबविण्यात येत आहे. …

Leave a Reply