पनवेल : वार्ताहर
रायगड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांची बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी अशोक दुधे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
शासनाच्या गृह विभागाकडून बुधवारी (दि. 7) भारतीय पोलीस सेवेतील पोलीस अधीक्षक व उपायुक्त दर्जाच्या अधिकार्यांच्या बदलीने पदस्थापना करण्याचे आदेश काढण्यात आले. या आदेशानुसार रायगडचे पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांची बदली करण्यात आली आहे, तर त्यांच्या जागी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ-2 (पनवेल)चे उपायुक्त अशोक दुधे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
Check Also
संत रोहिदास महाराज जयंती भाजपतर्फे विविध कार्यक्रमांनी होणार साजरी
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत नियोजन बैठक पनवेल : रामप्रहर वृत्तसंत रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त …
RamPrahar – The Panvel Daily Paper