पनवेल ः रामप्रहर वृत्त
रायगड जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असून, सोमवारी (दि. 19) नव्या 143 रुग्णांची आणि सहा रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली, तर दिवसभरात 345 रुग्ण बरे झाले आहेत.
पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 77 व ग्रामीण 13) तालुक्यातील 90, उरण 19, पेण व महाड प्रत्येकी सात, अलिबाग सहा, खालापूर पाच, श्रीवर्धन तीन, कर्जत व माणगाव प्रत्येकी दोन, मुरूड व म्हसळा तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे, तर मयत रुग्ण पनवेल तालुक्यात दोन आणि पेण, अलिबाग, माणगाव व पोलादपूर तालुक्यात प्रत्येकी एक असे आहेत. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 52,191 आणि मृतांची संख्या 1474 झाली आहे. जिल्ह्यात 48,605 जण कोरोनामुक्त झाल्याने 2112 विद्यमान रुग्ण आहेत.
Check Also
दिवाळी अंकांतून साहित्य क्षेत्राला नवी उंची -मंत्री आशिष शेलार
रौप्य महोत्सवी स्पर्धेचे पारितोषिक वितरण पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले …
RamPrahar – The Panvel Daily Paper