Breaking News

कोरोना रुग्णांनी धरला ठेका; नवी मुंबईतील तेरणा हॉस्पिटलमध्ये गरबा

नवी मुंबई : वार्ताहर

कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी नवी मुंबईच्या नेरूळ येथील तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेंटरतर्फे बुधवारी (दि. 21) गरब्याचे आयोजन करण्यात आले होते. कोरोनाची सौम्य लक्षणे असणार्‍या रुग्णांनी या वेळी पीपीई कीट घालून उत्तम प्रतिसाद दिला. यापूर्वी तेरणा हॉस्पिटलतर्फे कोरोनाचे संक्रमण झालेल्या रुग्णांना बसल्या जागेवरून योग प्रशिक्षण, नर्सेसकडून रक्षाबंधन, समुपदेशन तसेच शाळेतील मुलांना ऑनलाइन परीक्षा देण्यासाठी यंत्रणा उपलब्ध करून देणे असे उपक्रम राबविले गेले आहेत. त्यानंतर आता गरब्याचे आयोजन करण्यात आले होते. गरबा खेळताना सर्व रुग्णांनी मास्क, हातमोजे व पीपीई कीट घातले होते. कोरोनामुळे निराशेच्या गर्तेत जाणार्‍या नागरिकांची संख्या जास्त आहे. अशा नागरिकांचे समुपदेशन तसेच त्यांच्याशी संवाद साधण्याचे काम केले पाहिजे याच भावनेतून आम्ही गरब्याचे आयोजन केले होते, अशी माहिती तेरणा  हॉस्पिटल व रिसर्च सेंटरचे डेप्युटी जनरल मॅनेजर संतोष साइल यांनी दिली. देशात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी बरे झालेल्या रुग्णांची संख्याही दर दिवस दुपटीने वाढत आहे, असेही त्यांनी सांगितले.

Check Also

गिरवलेचे सरपंच प्रताप हातमोडे भाजपमध्ये दाखल

पनवेल : रामप्रहर वृत्तगिरवले गावचे सरपंच प्रताप चंद्रकांत हातमोडे यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी भारतीय जनता पक्षामध्ये …

Leave a Reply