Breaking News

रस्त्यांच्या डांबरीकरणाला सुरुवात

नगरसेवक शत्रुघ्न काकडे यांच्या पाठपुराव्याला यश

खारघर : रामप्रहर वृत्त

गेली अनेक महिने खारघर येथील सेक्टर 3 व 4मधील रस्त्यांच्या झालेल्या दुर्दशेसंदर्भात पनवेल महानगरपालिका प्रभाग समिती ‘अ’चे माजी सभापती व प्रभाग पाचचे नगरसेवक शत्रुघ्न काकडे यांनी वेळोवेळी सिडको प्रशासनाकडे पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला होता. त्याची परिणीती म्हणून येथील रस्त्यांच्या डांबरीकरणाला सुरुवात झाली आहे.

या वेळी कामाची पाहणी करताना नगरसेवक शत्रुघ्न काकडे, खारघर तळोजा उद्योग आघाडी अध्यक्ष राजेंद्र मांजरेकर, सोशल मीडिया संयोजक (अध्यक्ष) अजय माळी, भाजप पदाधिकारी आणि प्रभाग पाचमधील रहिवासी उपस्थित होते.

Check Also

कोकण मराठी साहित्य परिषदेच्यासल्लागारपदी लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तकोकण मराठी साहित्य परिषदेच्या सल्लागारपदी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची नियुक्ती …

Leave a Reply