Breaking News

राष्ट्रवादी युवा काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षावर बलात्काराचा गुन्हा

गृहमंत्री राजीनामा द्या; भाजयुमोची मागणी

पनवेल : रामप्रहर वृत्त
महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारच्या काळात महिला, मुलींवर होणार्‍या अत्याचारांंमध्ये वाढ झाली असून, महिला सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. अशातच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब इब्राहिम शेख यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. तरुणीवरील या अत्याचाराचा भारतीय जनता युवा मोर्चातर्फे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी (दि. 30) पनवेल येथे निषेध करण्यात आला. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणी राजीनामा द्यावा, अशी मागणी या वेळी करण्यात आली.
औरंगाबाद शहरातील बायजीपुरा येथे राहणार्‍या व खासगी शिकवणी घेणार्‍या 29 वर्षीय तरुणीला नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून तिच्यावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब इब्राहिम शेख यांनी अत्याचार केल्याचा आरोप आहे. या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेच्या निषेर्धात बुधवारी भाजपच्या पनवेल येथील मध्यवर्ती कार्यालय आवारात युवा मोर्चाच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. या वेळी पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, नगरसेविका रुचिता लोंढे, भाजप युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष मयुरेश नेतकर, पनवेल ग्रामीण अध्यक्ष आनंद ढवळे, विभागीय उपाध्यक्ष प्रतिक पाटील, शहर अध्यक्ष रोहित जगताप, रोहित घरत, चिटणीस कोमल पाटील, आयुफ अकुला, सरचिटणीस गौरव कांडपिळे, सदस्य अजिंक्य भिडे, अथर्व गुजरे, आकाश भाटी, विरल चोटाणी, सुदेश जाधव, अमोल ठीक, दर्शन राजपूरकर यांच्यासह युवा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
धिक्कार असो धिक्कार असो महाविकास आघाडीचा धिक्कार असो अशी घोषणा देऊन भाजप युवा मोर्चाने निषेध व्यक्त केला. या वेळी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पदधिकारी पीडित तरुणीची बाजू घेणार की तिच्यावर अत्याचार करणार्‍या पदाधिकार्‍याची असा सवाल उपस्थित केला तसेच राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली.

Check Also

माथेरानमधील हातरिक्षा संघटनेच्या आणखी सात सदस्यांचा भाजपत प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी माथेरानमधील हातरिक्षाचालक संघटनेच्या आणखी सात …

Leave a Reply