Breaking News

भाजी विक्रेत्यांना लुबाडणार्या शेकापच्या नेत्यांची भाजपकडून पोलखोल

कळंबोलीच्या मार्केटमधून गैरप्रकाराने लाखोंची उलाढाल

कळंबोली : प्रतिनिधी

कळंबोली सेक्टर 5 परिसरात असलेल्या भाजी मार्केटमधील आर्थिक हव्यासापोटी सुरू असलेल्या शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्यांची पोलखोल भाजपने सुरू केली आहे. त्यामुळे या भाजी मार्केटमधून गैरप्रकाराने लाखोंची उलाढाल करण्याचा प्रयत्न लवकरच उध्वस्त होणार आहे.

कळंबोलीच्या शेतकरी कामगार पक्षाच्या नावावर सत्तेचा गैरवापर करून या पक्षातील काही मंडळी भोळ्याभाबड्या भाजी व्यावसायिकांना आम्हीच तुमचे पाठीराखे आहोत, असे भासवून सिडकोच्या ताब्यातील भूखंडावर त्यांच्याकडून हजारो रुपये उकळून बेकायदेशीर बांधकाम ओटे बांधून या माध्यमातून लाखो रुपयांची उलाढाल करत होते. मात्र सर्व करून सावरून याबाबत भाजप नेत्यांवर आरोप प्रत्यारोप करण्याचा प्रकार सुरू असल्याने याबाबत सभागृह नेते परेश ठाकूर यांनी सिडकोला या अनधिकृत बांधकामाबाबत इशारा दिल्यानंतर चिरी मिरी पुढार्‍यांचे धाबे दणाणले आहेत.

शेतकरी कामगार पक्षाला कंटाळून भाजपच्या स्वच्छ  विचारधारेवर विश्वास ठेवून कळंबोलीत नगरसेवक बबन मुकादम, राणी कमल कोठारी व कळंबोली व्यापारी असोसिएशनचे कमल कोठारी यांनी आमदार प्रशांत ठाकूर त्यांच्या सकारात्मक विचारांवर प्रभावित होऊन भाजपचा झेंडा हाती घेतल्यानंतर या दोघांना कोणत्या ना कोणत्या कारणाने डिवचण्याचे काम शेकापकडून वारंवार होताना दिसत आहे.

 मात्र कर नाही तर डर कशाला या आत्मविश्वासाच्या जोरावर ही मंडळी तटस्त आहेत. त्याचप्रमाणे या भाजी मार्केटबाबत बबन मुकादम यांनी आमच्याकडून आर्थिक मागणी यापूर्वी केलेली असल्याची एका भाजी विक्रेत्या महिलेचा व्हिडिओ नुकताच व्हायरल करण्यात आला होता या सर्व प्रकाराबाबत बबन मुकादम यांनी मानहानी दावा ठोकण्याचा निर्णय घेतला असून या व्हिडीओ मध्ये आरोप करणार्‍या महिलेलने मुकादमांवर केलेले आरोपामध्ये तथ्य नसल्याचे स्वतःहून सांगितल्याने शेकापचे थातूर मातूर पुढारी तोंडघशी पडले आहेत.

 बबन मुकादम यांची भाजी विक्रेत्या महिलेने बदनामीकारक वक्तव्य एका वृत्त वाहिनीवर केल्यानंतर याबाबत मुकादम यांच्या पत्नी प्रिया मुकादम यांनी त्या भाजी विक्रेत्या महिलेला थेट जाऊन त्यांनी दिलेल्या बदनामी कारक प्रतिक्रियेबाबत विचारणा केली असता त्या विक्रेत्या महिलेने बबन मुकादम यांनी कधी पैशाची मागणी केलेली नाही, असे सांगितले. त्यामुळे या भाजी विक्रेत्यांचा बोलवता धनी शेकापचीच मंडळी असल्याचे स्पष्ट होत आहे.

त्यामुळे शेकापने सुरू केलेला भाजप नेत्याच्या बदनामीचा मनसुबा फोल ठरला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे सेक्टर 5 मासळी बाजारासमोर असलेल्या भाजी मार्केटमध्ये सुमारे 100 भाजी विक्रेते आहेत. या ठिकाणी त्यांना प्रशस्त जागा मिळून देण्यासाठी शेकापच्या काही टोळक्यांनी एकत्र येऊन प्रत्येकी 10 ते 20 हजार गोळा करून त्यांना सिमेंटचे ओटे बांधून देण्याची सुरवात केली होती. तसेच याठिकाणी सुमारे 120 ओटे तयार करण्याचा यांचा मानस होता त्यापैकी 20 ओटे प्रत्येकी दोन लाखांना विकण्याचा नियोजन करण्यात आले होते. कळंबोलीत वॉर्ड अधिकारी गायकवाड, सिडको अधिकारी यांना हाताशी घेऊन हा सर्व खेळ मांडण्यात आला होता. या सर्व प्रकारात सुमारे 50 लाखांची उलाढाल होणार होती. ही सर्व माया स्वतःचे अधिकार दमदाटी करून गोळा करण्याच प्रयत्न भाजपने हाणून पडण्याच्या हालचाली केल्याने शेकापच्या त्या टवाळखोरांचा थयथयाट सुरू झाला आहे.

भाजी विक्रेत्यांना खरचं मदत करायची असेल तर स्व खर्चाने यांनी भाजी विक्रेत्यांना अधिकृत पद्धतीने ओटे बांधून देणे गरजेचे आहे, असे बबन मुकादम म्हणाले आहेत.

दर महिन्याला 600 ते 800 रुपये घेऊन सुद्धा यांच्याकडून कट्ट्याच्या नावावर 10 हजार रुपये घेणे गैर आहे, कारण ओटे उभारले तरी आज ना उद्या अनधिकृत म्हणून या ओट्यांवर कारवाई झाल्यानंतर भाजी विक्रेत्यांचे होणार्‍या आर्थिक नुकसानाला जबाबदार कोण? हा प्रश्न उपस्थित होतो.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply