Breaking News

रोह्यात चिमुकल्या साहिशच्या हस्ते राम मंदिरासाठी देणगी

धाटाव : प्रतिनिधी

अयोध्येतील भव्य श्रीराम मंदिराच्या उभारणीसाठी संपुर्ण रायगडातून मंदिरासाठी निधी ओघ सुरू आहे. अशातच रोहा तालुक्यातील चिमुकला साहिश घाग याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या हस्ते रोहा तालुक्यातील निधी संकलन समितीकडे 21 हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.

या वेळी तालुका निधी संकलन समितीचे सदस्य हर्षद भाटे, किसन घाग, उत्तम भांड, भाजपचे दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष तथा राजमुद्रा फाऊंडेशनचे संस्थापक अमित घाग, रोठ ब्रुदुक नवनिर्वाचित भाजपचे ग्रामपंचायत सदस्य वेदिका डाके, श्रीपर्ण पथसंस्थेचे चेअरमन विलास डाके, विरेंद्र वारांगे, रोठ ब्रुदुक मा. ग्रामपंचायत सदस्य श्रद्धा घाग आदी उपस्थित होते.

Check Also

पनवेलमध्ये एसआयआर कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा

पनवेल ः रामप्रहर वृत्तभारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या मतदार याद्यांचा विशेष …

Leave a Reply