अभाविपच्या बुद्धिबळ स्पर्धेस अलिबागमध्ये खेळाडूंचा प्रतिसाद

अलिबाग : प्रतिनिधी
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अलिबाग शहराच्या वतीने विद्यार्थ्यांच्या बौद्धिक गुणांना वाव देण्यासाठी अलिबाग शहरस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन राम मंदिर हॉल या ठिकाणी करण्यात आले होते. या स्पर्धेत अलिबागमधील स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवत उत्स्फूर्त प्रतिसाद देत. सुमारे 80 बुद्धीबळपटूंनी या स्पर्धेत भाग घेतला.
स्पर्धेचे उद्घाटन भाजप दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अ‍ॅड. महेश  मोहिते, अभाविपचे प्रांत सहमंत्री अमित ढोमसे, रायगड जिल्हा चेस असोसिएशनचे विलास म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले. 13, 17, 21 वर्षे या वयोगटांमध्ये स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तिन्ही वयोगटांत पाच फेर्‍या पार करणार्‍या प्रथम तीन क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना पारितोषिक व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले तसेच प्रत्येक सहभागी स्पर्धकाला प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देण्यात आले.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अभाविपचे जिल्हा संयोजक यश म्हात्रे, शहरमंत्री श्रेयस जोगळेकर व अभाविप कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.

Check Also

पनवेल महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदांसाठी भाजप महायुतीकडून पाच जणांचे अर्ज दाखल

युवा नेते परेश ठाकूर, डॉ. अरुणकुमार भगत, गणेश कडू, अ‍ॅड. प्रथमेश सोमण, दिनेश खानावकर यांचा …

Leave a Reply