मुंबई : शेतकरी आंदोलनाला समर्थन देणार्या परदेशातील सेलिब्रिटींविरोधात ट्विट करणार्या भारतातील सेलिब्रिटींच्या ट्विटची चौकशी करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या संदर्भात चौकशीचे आदेश दिले आहेत. राज्य सरकारच्या या निर्णयावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सडकून टीका केली आहे. भारतरत्नांची चौकशी करणारे असे ‘रत्न’ देशात कुठेही सापडणार नाहीत तसेच चौकशी करण्याची मागणी करणारे आणि ती मागणी मान्य करणारे यांच्या मानसिक स्थितीचीच चौकशी केली पाहिजे, अशा शब्दांत त्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाबाबत सेलिब्रिटींनी केंद्र सरकारच्या दबावाखाली ट्विट केले का, याची चौकशी राज्याचे गुप्तहेर विभाग करणार आहे. या निर्णयावरून जोरदार टीका होत आहे.
Check Also
लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा शनिवारी ‘रयत’तर्फे हृद्य सत्कार
संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते होणार गौरव सातारा : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या …
RamPrahar – The Panvel Daily Paper