Breaking News

पिरकोनमधील शेकाप कार्यकर्ते भाजपत

उरण ः वार्ताहर

उरण तालुक्यातील पिरकोन गावातील शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, उरणचे आमदार महेश बालदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आमदार महेश बालदी यांच्या संपर्क कार्यालयात शुक्रवारी (दि. 12) भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. प्रणित परशुराम गावंड, संजय बाळकृष्ण पाटील, कुलदीप जयवंत गावंड आदी शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भाजपत प्रवेश केला. त्यांचे पक्षात स्वागत करण्यात आले. या वेळी भाजप तालुका अध्यक्ष रवी भोईर, तालुका सरचिटणीस सुनील पाटील, तालुका उपाध्यक्ष प्रकाश ठाकूर, तालुका उपाध्यक्ष मुकुंद गावंड, नवघर माजी सरपंच शेखर तांडेल, शहर युवा अध्यक्ष निलेश पाटील, उरण पूर्व विभाग अध्यक्ष शशी पाटील, डी. बी. गावंड, सुनील घरत, महेश गावंड, प्रमोद म्हात्रे, प्रभाकर गावंड, अमित गावंड आदी उपस्थित होते.

Check Also

टीआयपीएल अंडर-१९ क्रिकेट स्पर्धेचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्तसोसायटी क्रिकेट क्लबच्या वतीने आयोजित टीआयपीएल सिझन ३ अंडर-१९ क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन …

Leave a Reply