Breaking News

वाशिवली येथे माजी विद्यार्थ्यांचे गेट टुगेदर

मोहोपाडा : प्रतिनिधी

रसायनी पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील वाशिवली येथील डॉ.पारनेरकर विद्यालयातील दहावीच्या 2003-04 वर्षातील बॅचच्या वर्गांमध्ये शिकणारे विद्यार्थी एकत्र आले आणि आपला गेट टूगेदर साजरा केला. गुरुजनवर्ग जोशी सर व कोळी सर यांनी उपस्थित माजी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी घडवलेले विद्यार्थ्यांत कोणी इंजिनिअर, प्रोफेसर, मेडिकल तसेच गावचे सरपंच झाले आहेत. या वेळी अमित खिस्मतराव, जितेंन पाटील, अतुल मालकर, हरेश जाधव, राजेंद्र खंडागळे, कैलास देवघरे, स्वप्नील ठोबरे, विकास देवघरे, आकाश म्हात्रे तसेच नीता पाटील, उर्मिला मोरे, निकिता पवार, विद्या देवघरे, जयश्री पवार आदी वर्गमित्र उपस्थित होते. 17 वर्षांनंतर एकत्र आल्याने वर्गमित्रांनी एकमेकांशी चर्चा करून मनमोकळ्या गप्पा मारल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार अतुल मालकर यांनी मानले.

Check Also

पनवेलमध्ये महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

६४ कंपन्यांचा सहभाग; २५०२ उमेदवारांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तरोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींना थेट रोजगाराच्या …

Leave a Reply