Breaking News

महाडमध्ये भीमसागर लोटला

चवदार तळे सत्याग्रहाच्या वर्धापन दिनी महामानवाला अभिवादन

महाड : प्रतिनिधी
चवदार तळे सत्याग्रहाच्या 95व्या वर्धापन दिनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी महाडमध्ये रविवारी (दि. 20) भीमसागर लोटला. यामुळे चवदार तळे, क्रांतिस्तंभ परिसरासह महाड शहर जय भीमच्या घोषणेने दणाणून गेले.
भारतरत्न डॉ. आंबेडकरांनी महाडमध्ये सामाजिक क्रांती केली. चवदार तळ्याचा ज्या पायर्‍यांनी ते खाली उतरले व पाण्याला स्पर्श केला त्या पायर्‍यांवर भीम अनुयायांनी पाणी प्राशन करण्यासाठी आणि चवदार तळ्याचे पाणी कलशातून घेऊन जाण्यासाठी एकच गर्दी केली होती.
या वेळी विविध सामाजिक, धार्मिक, राजकीय संघटनांच्या वतीने अभिवादन सभाही आयोजित करण्यात आल्या होत्या. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर, बौद्धजन पंचायत समितीच्या मीराताई आंबेडकर, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे मनोज संसारे, भारत मुक्ती मोर्चाचे वामन मेश्राम, राज्य शासनाचे मंत्री जितेंद्र आव्हाड, पालकमंत्री आदिती तटकरे आदी सर्वपक्षीय नेते महाडमध्ये येऊन नतमस्तक झाले. त्याचबरोबर दिल्लीचे सामाजिक न्यायमंत्री राजेंद्रपाल गौतम यांनीही अभिवादन केले.

Check Also

पनवेलच्या झोपडपट्टी पुनर्वसनासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांचा पाठपुरावा

मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका क्षेत्रातील झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाचा आणि त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न …

Leave a Reply