Breaking News

सुवर्णपदक विजेत्या आर्यन पाटीलचा सत्कार

माणगाव : प्रतिनिधी
छत्तीसगडमधील रायपूर येथे झालेल्या राष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत रायगड जिल्ह्याच्या पेण तालुक्यातील रावे गावचा सुपुत्र व सध्या माणगावमध्ये राहणारा आर्यन अरुण पाटील याने सुवर्णपदक पटकाविले. या यशाबद्दल त्याचा अमित कॉम्प्लेक्स रहिवाशी मंडळाकडून नुकताच सत्कार करण्यात आला.
आर्यन पाटील याने उंच उडी या क्रीडा प्रकारात 18 वर्षाखालील वयोगटात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करीत सुवर्ण कामगिरी बजावली. त्याला प्रशिक्षक इंझमाममुल हक खान यांचे मार्गदर्शन लाभले.
सत्कार समारंभास मंडळाचे अध्यक्ष शिवाजी घाग, सदस्य वैभव आंब्रे, भानूदास पाटील, रविकिरण पालवे, संदेश पानसरे, अंकुश काळे, सुरेश ससाणे, समीर उकिर्डे, संग्राम उकिर्डे, रणजित बावणे, सुजल घाग, महेश बासंबेकर आणि आर्यनचा मित्र परिवार उपस्थित होता.

Check Also

चित्रपटाच्या नवीन भागांचा ट्रेंड

बस्स एक पिक्चर सुपर डुपर हिट होऊ देत… त्याच्या वाढत्या उत्पन्नाच्या भराभर ब्रेकिंग न्यूज येऊ …

Leave a Reply