Breaking News

‘लाइट ऑफ लाइफ’कडून आनंद मेळावा

कर्जत ः बातमीदार

लाइट ऑफ लाइफ ट्रस्टच्या माध्यमातून कर्जत नगर परिषद हद्दीत भिसेगाव येथे पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. लाइट ऑफ लाइफ कर्जत आणि खालापूर तालुक्यातील एकूण आठ केंद्रांतील जवळपास 500हून अधिक पालक दरवर्षी या मेळाव्यात वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सहभाग घेतात. वक्तृत्व, रांगोळी स्पर्धा, वैयक्तिक नृत्य, गायन, टाकावूपासून टिकाऊ या स्पर्धांचा त्यात समावेश होता.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व स्पर्धांसाठी पालकांना व्हिडीओ बनविण्यास सांगण्यात आले होते. विजयी ठरलेल्या 27 पालकांना पारितोषिके देण्यात आली. या वेळी अध्यक्षस्थानी प्रकल्प सहाय्यक व्यवस्थापक कांचन थोरवे, मोहिनी हजारे तसेच अंकिता थळे, प्रिया सोनावळे यांच्यासह पालक आणि लाइट ऑफ लाइफचे कर्मचारी उपस्थित होते.

Check Also

‌‘इच्छांचे दीप प्रवाही‌’ पुस्तकाचे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन

पनवेल : रामप्रहर वृत्तडॉ. प्रभाकर पटवर्धन आणि नीलाताई पटवर्धन या सेवाभावी दाम्पत्याच्या कार्यस्मृती जागवणारे तसेच …

Leave a Reply