Breaking News

भाजप कार्यालयात डॉ. आंबेडकर जयंती

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सानपाडा रेल्वे स्टेशनलगतच्या सेक्टर 3 येथील भाजपचे पांडुरंग आमले यांच्या जनसंपर्क कार्यालयात स्थानिक रहीवाशांच्या सहभागाने उत्साहात साजरी करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार प्रदान करून या वेळी उपस्थितांना पेढे वाटण्यात आले. रमेश शेटे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनपटाचा व कार्याचा आढावा घेतला. या जयंती कार्यक्रमात पांडुरंग आमले, समाजसेविका शारदा आमले, भाजपचे सानपाडा तालुका सरचिटणीस रमेश शेटे, सानपाडा महिला मोर्चा तालुकाध्यक्षा आज्ञा गव्हाणे, सानपाडा तालुका महिला मोर्चा सचिव दिशा केणी, नाना शिंदे यांच्यासह स्थानिक रहीवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

कळंबोलीत रंगणार कुस्त्यांचा आखाडा

विजेत्याला मिळणार पाच लाख रुपये व मानाची गदा पनवेल : प्रतिनिधीउदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय …

Leave a Reply