Breaking News

रक्तदान शिबिरास उत्स्फू र्त प्रतिसाद

पनवेल ः वार्ताहर

विमल फाऊंडेशन आणि तेरणा ब्लड सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने सुकापूर येथील बालाजी सिंफोनी येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरास येथील रहिवाशांनी मोलाचे सहकार्य करून रक्तदान करीत उत्स्फू र्त प्रतिसाद दिला. समाजात रक्तदानाचे महत्त्व रुजविणे आणि समाजाला रक्तदानासाठी प्रेरित करण्याच्या अनुषंगाने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, अशी प्रतिक्रिया विमल फाऊंडेशनचे अध्यक्ष आकाश ढसाळ यांनी या वेळी व्यक्त केली. कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते राजेश केणी, किशोर पाटील, निखिल म्हात्रे आदी उपस्थित होते. रक्तदान शिबिरात 100 पिशव्या रक्त संकलित करण्यात आले. शिबिरास तेरणा हॉस्पिटलमधील डॉक्टर, नर्सेस यांचे विशेष सहकार्य लाभले.

Check Also

नवी मुंबई विमानतळाला लोकनेते स्व. दि.बा. पाटील यांचेच नाव दिले जावे यासाठी आम्ही आग्रही -मुख्यमंत्री

छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण पनवेल ः रामप्रहर वृत्तनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते स्व. …

Leave a Reply