Breaking News

पनवेल : महापालिका हद्दीतील तोंडरे गावात असलेल्या गटारामध्ये पावसाळ्यात पाणी मोठ्या प्रमाणात साचते. त्या पार्श्वभूमीवर भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी या गटाराची अधिकार्‍यांसह पाहणी केली. या वेळी त्यांनी पावसाला सुरुवात होण्यापूर्वी हे काम करण्यासंदर्भात अधिकार्‍यांना सूचना दिल्या. पाहणीदरम्यान सभागृह नेते परेश ठाकूर, प्रभाग समिती ‘अ’च्या सभापती अनिता पाटील, नगरसेवक अनिल भगत, हरेश केणी, नितीन पाटील, भाजप नेते वासुदेव पाटील, तालुका उपाध्यक्ष राम पाटील, कार्यकर्ते महेश पाटील, श्रीनाथ पाटील, मेघनाथ पाटील, शहर अभियंता संजय कटेकर आदी उपस्थित होते.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply