नवी दिल्ली : केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशांक यांनी रविवारी (दि. 23) राज्यांसोबत व्हर्च्युएल बैठक घेतली. यात केंद्र सरकारने बारावी बोर्डाच्या परीक्षेसंबंधी राज्यांसमोर दोन पर्याय ठेवले आहेत. केवळ महत्त्वाच्या विषयांची परीक्षा घेणे किंवा परीक्षेची पद्धत बदलणे असे दोन पर्याय केंद्र सरकारकडून सूचवण्यात आले आहेत. याशिवाय शिक्षणमंत्र्यांनी कोरोनाच्या परिस्थितीनुसार राज्याला निर्णय घेण्यास सांगितले आहे. शिक्षणमंत्री म्हणाले की, मी राज्यांना त्यांच्या सूचना 25 मेपर्यंत देण्यास सांगितले आहे. बारावीच्या परीक्षेबाबत आम्ही लवकरच निर्णय घेऊ आणि पालकांमध्ये असलेली सांशकता दूर करू. विद्यार्थी आणि शिक्षकांची सुरक्षा आमच्यासाठी महत्त्वाची आहे. सूत्रांच्या माहितीनुसार सीबीएससी बारावी बोर्डाच्या परीक्षेची तारीख आणि परीक्षा पद्धत 1 जून रोजी जाहीर केली जाणार आहे.
Check Also
महात्मा फुले महाविद्यालयात पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ
मान्यवरांची लाभली उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या पनवेल येथील महात्मा फुले कला, विज्ञान …
RamPrahar – The Panvel Daily Paper