खोपोली, खालापूर ः प्रतिनिधी
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आडोशी हद्दीत गुरुवारी (दि. 1) चार वाहनांचा भीषण अपघात घडला. यात एक कार पूर्णपणे जळून खाक होऊन त्यातील तिघांचा होरपळून जागेवरच मृत्यू झाला.
आडोशी हद्दीतील तीव्र उतारावर एका कंटेनरने आय 10 कारला जोरदार धडक दिली. त्यामुळे ती कार पुढील पुढील ट्रकवर धडकली व तिने पेट घेतला. त्याच कंटेनरने पुढील अजून एका कारला धडक देऊन तो अनियंत्रित होऊन उलटला. या अपघातात आय 10 कारमधील आई, वडील व मुलाचा मृत्यू झाला. मृतांमध्ये लुईझा चितीयार (वय 35), झोकिंम चितीयार (34) आणि धायरल चितीयार (4) यांचा समावेश आहे, तर कंटेनरचालक गंभीर जखमी झाला असून त्याला कळंबोली एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Check Also
संत रोहिदास महाराज जयंती भाजपतर्फे विविध कार्यक्रमांनी होणार साजरी
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत नियोजन बैठक पनवेल : रामप्रहर वृत्तसंत रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त …
RamPrahar – The Panvel Daily Paper