Breaking News

सबालेंका, श्वीऑनटेक, प्लिस्कोव्हा चौथ्या फेरीत

विम्बल्डन खुली टेनिस स्पर्धा

लंडन ः वृत्तसंस्था
जागतिक टेनिस क्रमवारीत चौथ्या स्थानावरील आर्यना सबालेंका, नवव्या क्रमांकावरील इगा श्वीऑनटेक आणि 13व्या क्रमांकावरील कॅरोलिना प्लिस्कोव्हा यांनी विम्बल्डन खुल्या टेनिस स्पर्धेची चौथी फेरी गाठली. दुसरीकडे गॅब्रिन मुगुरूझा व दिएगो श्वार्ट्झमन यांचे आव्हान संपुष्टात आले.
महिला एकेरीत बेलारूसच्या द्वितीय मानांकित सबालेंकाने कोलंबियाच्या मारिया कॅमिला ओसोरिओ सेरानोवर 6-0, 6-3 असे वर्चस्व गाजवले. याचप्रमाणे माजी फ्रेंच विजेत्या पोलंडच्या सातव्या मानांकित श्वीऑनटेकने रोमानियाच्या इरिना-कॅमेलिया बेगूचा 6-1, 6-0 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. चेक प्रजासत्ताकच्या आठव्या मानांकित प्लिस्कोव्हाने आपल्याच देशाच्या तेरेझा मार्टिनकोव्हाला 6-3, 6-3 अशा फरकाने नामोहरम केले. थेट प्रवेशिकेद्वारे विम्बल्डन पदार्पणाची संधी मिळालेल्या लुडमिला सॅमसोनोव्हाने अमेरिकेच्या स्लोआनी स्टीफन्सला 6-2, 2-6, 6-4 असे नमवून लक्ष वेधले. ट्युनिशियाच्या 21व्या मानांकित ऑन्स जॅबीरने स्पेनच्या 11व्या मानांकित मुगुरूझाचा 5-7, 6-3, 6-2 असा पराभव केला.
पुरुष एकेरीच्या तिसर्‍या फेरीत रशियाच्या आंद्रे रुबलेव्हने प्रथमच विम्बल्डनची चौथी फेरी गाठताना फॅबिओ फॉगनिनीला 6-3, 5-7, 6-4, 6-2 असे हरवले. सर्बियाच्या अग्रमानांकित नोव्हाक जोकोव्हिचने डेनिस कुडलाचे आव्हान 6-4, 6-3, 7-6 असे मोडित काढले. रशियाच्या 25व्या मानांकित कॅरीन खाचानोव्हने अमेरिकेच्या फ्रान्सिस टिआफोईवर 6-3, 6-4, 6-4 असा विजय मिळवला.
हंगेरीच्या मार्टन फुक्सोव्हिक्सने अर्जेटिनाच्या श्वार्ट्झमनला 6-3, 6-3, 6-7, 6-4 असे पराभूत केले.

Check Also

सुभाष घईंच्या दिग्दर्शनाची यशस्वी पन्नाशी

तुम्हालाही माहित्येय आज आपण डिजिटल युगात वावरतोय, चित्रपट माध्यमात व्हीएफएक्स आणि एआय तंत्रज्ञानाचा वापर वाढलाय, …

Leave a Reply