टोकियो ः भारताची स्टार बॅटमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने टोकियो ऑलिम्पिकमध्ये देशाला दुसरे पदक जिंकून दिले आहे. कांस्यपदकाच्या लढतीत सिंधूने चीनच्या बिंग जिओ हिचा पराभव करून इतिहास रचला. सिंधूचे हे ऑलिम्पिकमधील दुसरे पदक ठरले. याआधी तिने रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकले होते. अशी कामगिरी करणारी ती पहिली बॅडमिंटनपटू ठरली आहे. उपांत्य फेरीतील लढतीत सिंधूचा पराभव झाला होता. त्यामुळे सुवर्णपदकाची संधी हुकली, पण रविवारी (दि. 1) सिंधूने निराश केले नाही. कांस्यपदकाच्या लढतीत सिंधूने चीनच्या ही बिंग जिआओचा 21-13, 21-15 असा पाडाव केला. याआधी मीराबाई चानूने वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदकाची कमाई केली होती. त्यात आता सिंधूने भारताच्या झोळीत कांस्यपदक आणून ठेवले आहे.
Check Also
पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …
RamPrahar – The Panvel Daily Paper