Breaking News

महायुतीला महाप्रतिसाद

रसायनी, कर्नाळा परिसरात दमदार रॅली

पनवेल : रामप्रहर वृत्त

ज्या ग्रामीण भागात पूर्वी प्रस्थापित पक्षांचे वर्चस्व होते तेथे आता भाजप, शिवसेनेने आपली पाळेमुळे घट्ट रोवली आहेत. त्याचा प्रत्यय महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या पनवेल तालुक्यातील प्रचार दौर्‍यात येत आहे. शुक्रवारी (दि. 19) रसायनी आणि कर्नाळा परिसरात निघालेल्या रॅलीलाही कार्यकर्त्यांसह ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विशेष म्हणजे भरउन्हातही महायुतीचे शिलेदार उत्साहाने प्रचार करीत असल्याचे दिसून आले.

शिवसेना, भाजप, रिपाइं व मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचाराने एव्हाना चांगलाच जोर पकडला आहे. गावोगावी आणि घरोघरी महायुतीचे कार्यकर्ते मतदारांशी संवाद साधत आहेत. अशाचप्रकारे शुक्रवारी खासदार बारणे यांची रॅली निघाली होती. वावेघर येथील शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करीत प्रचार फेरीला सुरुवात झाली. यानंतर कराडे, चावणे, कासप, तुराडे, पोसरी, गुळसुंदे, लाडिवली, आपटा, साई, दिघाटी, केळवणे, तारा, बारापाडा, शिरढोण आदी गावांमध्ये रॅली फिरली. या वेळी सर्वत्र जोरदार स्वागत झाले, तर ठिकठिकाणी महिलांनी औक्षण केले. खासदार बारणे यांनी हनुमान जयंतीनिमित्ताने बजरंग बलीचे दर्शन घेऊन विजयाचे साकडे घातले.

या रॅलीत आमदार मनोहर भोईर, जेएनपीटीचे विश्वस्त तथा भाजपचे जिल्हा सरचिटणीस महेश बालदी, पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, सरचिटणीस प्रल्हाद केणी, दशरथ म्हात्रे, शिवसेना तालुकाप्रमुख रघुनाथ पाटील, पं. स. सदस्या तनुजा टेंबे, भाजप तालुका उपाध्यक्ष संजय टेंबे, गुळसुंदे जि. प. विभाग अध्यक्ष प्रवीण खंडागळे, पं. स. अध्यक्ष सुनील माळी, युवा मोर्चाचे रोशन पाटील, केळवणे पं. स. विभाग अध्यक्ष हिरामण ठाकूर, शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख अशोक थोरवे, कर्नाळा विभागप्रमुख डॉ. भरत घरत, माजी सभापती रमेश पाटील, विभागप्रमुख अजित सावंत, माजी सरपंच रोशन राऊत, ज्ञानेश्वर सुर्वे, सावळे ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष माळी, माजी सरपंच डॉ. अविनाश माळी, गुळसुंदे ग्रामपंचायतीचे सरपंच हरिश बांडे, सदस्य मनोज पवार, मारुती माठळ, नूतन पाटील, प्रभावती कार्लेकर, पल्लवी शिगवण, माजी सदस्य यशवंत ऊर्फ बाळा जाधव, वावेघर ग्रामपंचायतीचे उपसरपंच विलास माळी, खंडूशेठ माळी, राजेश माळी, रामचंद्र माळी, महादेव कांबळे, गणपत केदारी, ज्ञानेश्वर माळी, जांभिवली ग्रामपंचायतीचे सरपंच महादू निकम, कल्पेश कोंडिलकर, शेखर जाधव, संदीप गोडिवले, कासपचे मारुती पाटील, कराडे खुर्द ग्रामपंचायतीचे माजी सरपंच व विद्यमान सदस्य विजय मिरकुटे, दिघाटी ग्रामपंचायतीचे सरपंच अमित पाटील, सदस्य रोहिदास शेडगे, सदस्या स्मिता ठाकूर, साई ग्रामपंचायतीचे सरपंच विद्याधर मोकल, शाखाप्रमुख रमाकांत मोकल, विजय मोकल, केळवणे ग्रामपंचायतीच्या सरपंच अश्विनी संदीप घरत, शिरढोण ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच मंगेश वाकडीकर, तुराडेतील गोविंद भोईर, गणेश ठाकूर, निकेश ठाकूर, लाडिवलीतील लक्ष्मण गोडिवले, अशोक मालुसरे, भरत वाघे, आकुलवाडीतील भरत पाटील, आपट्याचे मोबिन मुल्ला, कदम आदी गावोगावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.

Check Also

रायगड जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत ओमकार वेश्वी, कर्नाळा स्पोर्टस् अकॅडमी संघ विजेते

पनवेल : रामप्रहर वृत्तगोरगरिबांचे आधारस्तंभ, दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी …

Leave a Reply