Breaking News

डॉ. गिरीश गुणे यांच्या हस्ते राऊत क्लिनिकचे उद्घाटन

उरण, चिरनेर : प्रतिनिधी

पी. पी. खारपाटील एज्युकेशनच्या माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य सुरदास राऊत यांचे सुपुत्र डॉ. व्हॅन्युज सुरदास राऊत यांनी सुरू केलेल्या राऊत क्लिनिकचे उद्घाटन पनवेल येथील डॉ. गिरीश गुणे यांच्या हस्ते नुकतेच चिरनेर येथे करण्यात आले.

दिवसेंदिवस बदलणार्‍या वातावरणामुळे मानवी आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे आजाराचे प्रमाणदेखील वाढत आहे. गावात लोकांची संख्याही खूप वाढली आहे. त्यामुळे दवाखान्याची गरज भासत होती. ही गरज राऊत क्लिनिकच्या माध्यमातून पूर्ण झाली आहे. त्यामुळे गावकर्‍यांना चांगला दिलासा मिळाला आहे. या वेळी लहान मुलांचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश पाटील, सरपंच संतोष चिर्लेकर, उपसरपंच प्रियांका गोंधळी, प्राचार्य सुरदास राऊत, तसेच शाळेचे व कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, चिरनेर व कळंबुसरे येथील नागरिक उपस्थित होते.

Check Also

सुभाष घईंच्या दिग्दर्शनाची यशस्वी पन्नाशी

तुम्हालाही माहित्येय आज आपण डिजिटल युगात वावरतोय, चित्रपट माध्यमात व्हीएफएक्स आणि एआय तंत्रज्ञानाचा वापर वाढलाय, …

Leave a Reply