Breaking News

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचे जलतरणात सुयश

पनवेल : रामप्रहर वृत्त

कर्नाळा स्पोर्ट्स अकादमी पनवेल यांच्या सौजन्याने व अ‍ॅक्वा स्पोर्ट्स असोसिएशन पनवेल यांच्या सहकार्याने   बटरफ्लाय, बॅकस्ट्रोक्स, फ्री स्टाईल स्विमिंगच्या स्पर्धा  दिनांक 17 एप्रिल रोजी  आयोजित करण्यात आल्या होत्या.

सदर बटरफ्लाय, बॅकस्ट्रोक्स  फ्री स्टाईल स्विमिंगच्या स्पर्धेत रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचा  विद्यार्थी हर्षल शर्मा (8वी-ई) याने सहभाग घेऊन त्याने 50 मीटर बटरफ्लाय- सिल्वर 1, 50 मीटर बॅकस्ट्रोक्स- सुवर्ण 1, 50 मीटर फ्रीस्टाईल स्विमिंग- सुवर्ण 1 अशी पदके मिळविली.

वरील यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन रामशेठ ठाकूर व शाळेच्या मुख्याध्यापिका राज अलोनी यांनी विशेष कौतुक करून अभिनंदन केले.

Check Also

रोटरी क्लबच्या पैठणी महोत्सवाचे उद्घाटन

आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती पनवेल ः रामप्रहर वृत्तरोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलच्या वतीने …

Leave a Reply