Breaking News

‘आरटीआयएससी’मध्ये टेनिस प्रशिक्षण

उलवे नोड : रामप्रहर वृत्त

येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स (आरटीआयएससी)मध्ये एएसए टेनिस अकॅडमी स्थापन करण्यात येत असून, या माध्यमातून टेनिसची आवड असणार्‍यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहेत. येत्या रविवारी (दि. 21) स. 11 वाजता हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

या सोहळ्यास आरटीआयएससीचे संस्थापक रामशेठ ठाकूर, सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आरटीआयएससीचे एमडी परेश ठाकूर, सरचिटणीस वाय. टी. देशमुख, खेळाडू विशाल जाधव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहाणार आहेत. त्याचप्रमाणे सर्व संचालक उपस्थित असतील.

टेनिस प्रशिक्षण साडेचार वर्षांवरील खेळाडूंसाठी दिले जाणार असून, सकाळी 7 ते 9 आणि दुपारी 3 ते सायंकाळी 7 या वेळेत वर्ग घेण्यात येतील. अधिक माहितीसाठी 9768777189, 9833798901 किंवा 9768077721 या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Check Also

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेणे गरजेचे -आमदार प्रशांत ठाकूर

खारघरमध्ये पर्यावरणपूरक शवदाहिनीचे लोकार्पण, प्राणी अंत्यसंस्कार केंद्राचे भूमिपूजन खारघर ः रामप्रहर वृत्तपर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आपण …

Leave a Reply