Breaking News

क्रिकेटपटू साक्षी लाडचा गावकीकडून सत्कार

कर्जत ः प्रतिनिधी

रायगड जिल्ह्याच्या 19 वर्षांखालील मुलींच्या क्रिकेट संघात कर्जत तालुक्यातील दहिवली येथील साक्षी विलास लाड हिची निवड झाली आहे. साक्षीच्या रूपाने कर्जतमधील महिला क्रिकेटपटूची निवड होणे ही पहिलीच घटना आहे. याबद्दल तिचा दहिवली येथे गावकीकडून सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास माजी आमदार सुरेश लाड, माजी नगराध्यक्ष शरद लाड, माजी सरपंच संदेश गुरव, ज्येष्ठ नागरिक दत्तात्रेय लाड, शिरीष दिघे, नंदू लाड, लक्ष्मीकांत लाड, ऋषिकेश दाभाडे, तुषार देशमुख, जहीर खान आदी उपस्थित होते. सर्वांनी साक्षीचे अभिनंदन केले. साक्षीने आपल्या मनोगतात, आता माझी जबाबदारी वाढली असून मला अधिक चांगला खेळ करावा लागेल, असे म्हटले.

Check Also

पनवेल चेरीवली शाळेला संगणक, सीसीटीव्ही आणि वायफाय सुविधा

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते साहित्य सुपूर्द पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्हा परिषदेची पनवेल तालुक्यातील …

Leave a Reply