पनवेल : कर्नाळा बँकेच्या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळाप्रकरणी बँकेचे अध्यक्ष आणि शेतकरी कामगार पक्षाचे नेते, माजी आमदार विवेकानंद शंकर पाटील यांचा तळोजा जेलमधील मुक्काम सत्र न्यायालयाने 28 सप्टेंबरपर्यंत वाढवला आहे. त्यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) 15 जून रोजी पनवेल येथील घरातून अटक केली होती. विवेक पाटील यांना तळोजा जेलमधून रिलायन्स फाऊंडेशनच्या हॉस्पिटलमध्ये ईडीच्या बंदोबस्तात तपासणीसाठी नेण्यास न्यायालयाने परवानगी दिली होती. त्यानुसार त्यांची रुग्णालयात तपासणी करून आणल्याचे व त्याचा अहवाल न्यायालयात सादर केल्याचे समजते. विवेक पाटील यांच्या न्यायालयीन कोठडीची मुदत गुरुवारी (दि. 9) संपत होती. त्यांना तळोजा जेलमधून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे ईडी न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते.
Check Also
‘हिंद दी चादर’ गुरू तेग बहादूर यांचा 350वा शहिदी समागम
दोन दिवसीय भव्य कार्यक्रमासाठी खारघर सज्ज पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी …
RamPrahar – The Panvel Daily Paper