Breaking News

ओमानचा पापुआ न्यू गिनीवर विजय

अल अमिरात ः वृत्तसंस्था

यजमान ओमानने टी-20 विश्वचषक स्पर्धेची सुरुवात विजयासह केली आहे. स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात त्यांनी पापुआ न्यू गिनीचा (पीएनजी) 10 गडी राखून पराभव केला. ओमानचा कर्णधार जीशान मकसूदने नाणेफेक जिंकून पीएनजी संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. पीएनजी संघ 20 षटकांत 9 गडी गमावून 129 धावाच करू शकला. ओमानने 13.4 षटकांत एकही विकेट न गमावता लक्ष्य गाठले. जतिंदर सिंगने नाबाद 73, तर दुसरा सलामीवीर आकिब इलियासने नाबाद 50 धावा केल्या. 130 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आकिब आणि जतिंदरने ओमानला चांगली सुरुवात दिली. पॉवरप्लेमध्येच संघाने कोणतीही विकेट न गमावता 46 धावा जोडल्या. यानंतर या दोघांनी 12व्या षटकातच 100चा आकडा पार केला. जतिंदरने षटकारासह आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर आकिबनेही डावाच्या 14व्या षटकाच्या तिसर्‍या चेंडूवर आपले अर्धशतक पूर्ण केले. तत्पूर्वी ओमानचा कर्णधार जीशानने अवघ्या 20 धावांत चार बळी घेतले. त्याला सामनावीर म्हणूनही गौरवण्यात आले. पीएनजी कर्णधार असद वाला याने शानदार अर्धशतक झळकावले. त्याने 43 चेंडूंत चार चौकार आणि तीन षटकार मारले. असदने चार्ल्स अमिनी (37) सोबत तिसर्‍या विकेटसाठी 81 धावा जोडल्या. ओमानकडून बिलाल खान आणि कलीमुल्लाहनेही प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.

Check Also

सुभाष घईंच्या दिग्दर्शनाची यशस्वी पन्नाशी

तुम्हालाही माहित्येय आज आपण डिजिटल युगात वावरतोय, चित्रपट माध्यमात व्हीएफएक्स आणि एआय तंत्रज्ञानाचा वापर वाढलाय, …

Leave a Reply