पनवेल ः रामप्रहर वृत्त
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल विधानसभा मतदारसंघात विकासाची अनेक कामे सुरू आहेत. त्या अंतर्गत नेरे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या स्थानिक विकास निधीमधून रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. या कामाचे भूमिपूजन भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते शनिवारी (दि. 30) झाले.
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या स्थानिक विकास निधीमधून नेरे येथील सरकारी हॉस्पिटल ते तेजस जाधव यांच्या घरापर्यंतच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमास पं. स. सदस्य राज पाटील, नेरे ग्रामपंचायतीच्या सरपंच राजश्री म्हस्कर, माजी सरपंच वासुदेव गवते, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश घाडगे, वर्षा पाटील, एकनाथ पाटील, गोपीनाथ पाटील, निलेश पाटील, राम पाटील, कृष्णा मगर, गजानन पाटील, दीपक पाटील, मंगेश जाधव, सुनील गायकवाड, युवा मोर्चा नेरे जि. प. अध्यक्ष सागर पाटील, हर्षल पाटील, सुनील दौंड, शैलेश बंगलेकर, आनंद यादव, प्रीती आढाव, सुधा पाटील, विश्वास भोसले यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
Check Also
नतनोत्सवाने पनवेलमध्ये रंगला कलेचा सुरेल जल्लोष
नगरसेवक परेश ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तसांस्कृतिक कलेचा वारसा जपणाऱ्या नृत्यार्पण फाईन …
RamPrahar – The Panvel Daily Paper