Breaking News

कर्जतमध्ये निराधार महिला, आदिवासींना फराळ-फटाक्यांचे वाटप

कर्जत : प्रतिनिधी

शहरातील दहिवली येथील शासकीय कृपा महिला वसतीगृहातील पीडित, निराधार महिलांना कर्जत तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने आणि जि.प.च्या माजी सभापती चित्राताई तिटकारे यांच्या सहकार्याने दिवाळी निमित्त फराळाचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम गेली पंधरा वर्षे सुरू आहे.

वसतीगृहाच्या सुरक्षा रक्षक अनिता जाधव यांनी उपस्थितांचे स्वागत केले. पत्रकार संजय गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. तुमच्या समस्या बिनधास्तपणे सांगा. त्या सोडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, अशी ग्वाही कर्जत पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक सुवर्णा पत्की यांनी या वेळी दिली. तालुका मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष विजय मांडे यांनीही मनोगत व्यक्त केले. वसतीगृहातील नूतन चव्हाण, कुनिरता स्वामी, नेहा पटेल या महिलांनी गीते सादर केली.

राहुल तिटकारे, सुरेश सावंत, वैशाली तिटकारे, सुधार गृहाच्या वरिष्ठ काळजी वाहक सुरेख जाधव,  जयश्री सकपाळ, जितेंद्र रुठे, आयुष रेणोसे, श्रावणी सावंत, इचिता व ईश्वरी तिटकारे यांच्या हस्ते फराळाचे वाटप करण्यात आले.

कर्जत : बातमीदार

गरीब घरातील मुलांनीही दिवाळी फराळ आणि फटाक्यांसोबत साजरी करावी या भावनेने कर्जतमधील दगडे खानावळ आणि रायगड चाईल्ड लाइन यांच्या संयुक्त विद्यमाने तिवरे परिसरातील आदिवासी वाडीतील दीडशे मुलांना फटाके आणि खाऊचे वाटप केले. या वेळी जगदीश दगडे, बेबीताई दगडे, राजन कन्नन, हरिचंद्र दगडे, सुनीता दगडे, प्रथमेश गायकवाड, काशी कुरेशी, समीर अन्सारी उपस्थित होते.

Check Also

नांदगाव येथे भाजप महायुतीचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात …

Leave a Reply